Advertisement

Bakri Eid: रहिवाशी संकुलात बकऱ्यांच्या कुर्बानीला बंदी, हायकोर्टाचे निर्देश

हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगावातील दोन रहिवाश्यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती.

Bakri Eid: रहिवाशी संकुलात बकऱ्यांच्या कुर्बानीला बंदी, हायकोर्टाचे निर्देश
SHARES

देशभरात बकरी ईद साजरी होत आहे. पण आता रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देता येणार नाही. कारण मुंबई हायकोर्टानं तातडीनं सुनावणी घेत याला मज्जाव केला आहे. कोर्टाच्या या निर्देशांचे पालन झाले नाहीतर अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. (Bakri Eid Goats cannot be sacrificed in residential complex Imp instructions by Bombay High Court)

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रहिवाशी संकुलात प्राण्यांच्या कत्तलीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं तातडीनं सुनावणी घेतली. तसेच निवासी संकुलात विनापरवानगी प्राण्यांची कुर्बानी देण्यास मज्जाव असेल असे निर्देश दिले.

तसेच कोर्टाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुंबई पोलीस आणि मुंबई पालिकेला आदेशही देण्यात आले आहेत.

हरेश जैन आणि अपेक्षा शाह या गिरगावातील दोन रहिवाश्यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. खुल्या जागेत जनावरांची कुर्बानी दिल्यानं अनेक प्रकारचं प्रदूषण तसेच आजार पसरण्याचा धोका याचिकेत करण्यात आला होता. पोलिसांत तक्रार देऊनही स्थानिक पोलीस दाद देत नसल्यानं त्यांना नाईलाजानं हायकोर्टात धाव घ्यावी लागली, असं त्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वाद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा