Advertisement

मागाठाणे मेट्रोच्या प्रवाशांनो 'हे' बदल जाणून घ्या

भूस्खलन सातत्याने झाले तर मेट्रोचे मागाठाणे स्थानक हे ढासळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, मेट्रोच्या खांबानांही धोका निर्माण झाला आहे.

मागाठाणे मेट्रोच्या प्रवाशांनो 'हे' बदल जाणून घ्या
SHARES

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या इन्ट्री आणि एक्जिटमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.  या स्थानकाजवळील महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावरील काही भाग खचला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही तात्पुरते बदल केल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. तसेच याचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागाठाणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

1. मागाठाणे स्थानकाच्या उत्तरेकडील जिना/सरकता जिना प्रवेश/निकासासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.

2. उत्तरेकडील लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे.

3. बाधित जागेकडील कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे.

4. सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घ्या.

पण एका युझरने ट्विटरवर शेअर केलेल्या धक्कादायक व्हिज्युअलमुळे मात्र सर्वांच्याच चिंतेत अधिक भर पडली आहे. व्हिडिओमध्ये मागाठाणे मेट्रो स्टेशनचा एरिअल शॉर्ट दिसत आहे. यामध्ये मेट्रोला लागून असलेला काही रस्ता खोदून ठेवला आहे तर काही रस्ता खचत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

भूस्खलन सातत्याने झाले तर मेट्रोचे मागाठाणे स्थानक हे ढासळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, मेट्रोच्या खांबानांही धोका निर्माण झाला आहे.


हेही वाचा

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्थानक धोक्यात, दरड कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा