मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने बांधलेल्या मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळ दरड कोसळली. स्टेशनजवळील रस्त्याचा काही भाग खचल्याच्या अवघ्या एक दिवसानंतर ही घटना घडली. स्थानकाजवळ बांधकाम सुरू आहे. पण आता भूस्खलनाचा व्हिडिओ समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. फ्री प्रेस जनर्लने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
महामुंबई मेट्रोपॉलिटन ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने स्टेशनच्या उत्तर टोकावरील इन्ट्री आणि एक्जिट बंद केले आहेत.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @Sunilrane_bjp @A_AsawariPatil @mybmc check video, this is extremely scary. Hope you are doing something about this . Location magathane metro station, Borivali East pic.twitter.com/V3I788LZiO
— Amit Seth (@twitamitseth) June 28, 2023
“रस्त्यावर खूप चिखल आहे आणि त्याचा काही भाग बॅरिकेड करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या बांधकामाधीन जागेच्या विकासकासोबत हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा,” असे कांदिवलीचे रहिवासी वकील रवी पंजाबी यांनी फ्री प्रेसला सांगितले.
खोदकामाच्या ठिकाणी अनेक डंपर ट्रक भरताना दिसल्याचा दावा रहिवाशांनी केला.
आज सोशल मीडियावर भूस्खलनाची नाट्यमय दृश्ये समोर आली आहेत ज्यात स्टेशनच्या अगदी शेजारी बांधकाम साइटजवळील चिखलातून पाणी बाहेर पडताना दिसत आहे.
"BMC आणि MMMOCL सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणी करून आणि शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण करून सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. तुमची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे! प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर व्यक्त करतो," मेट्रोने ट्विटरवर ही माहिती दिली.
मेट्रोच्या सूचना
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही तात्पुरते बदल केल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. तसेच याचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
1. मागाठाणे स्थानकाच्या उत्तरेकडील जिना/सरकता जिना प्रवेश/निकासासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
2. उत्तरेकडील लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे
3. बाधित जागेकडील कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे.
4. सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
मुंबईत मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे जून महिन्यातील बहुतांश भागात हलका पाऊस झाला नाही. मात्र, नैऋत्य मोसमी पावसाचे अखेर रविवारी पूर्ण ताकदीनिशी मुंबईत आगमन झाले. शहर आणि उपनगरात अधूनमधून पाऊस पडत असून त्यामुळे तापमानात घट झाली आणि उष्णतेपासून दिलासा मिळाला.
हेही वाचा