Advertisement

मेट्रो-5 च्या फेज-2 चे काम एकाच वेळी होणार, ठाणे-भिवंडी-कल्याणमधील प्रवाशांना फायदा

MMRDA ने का बदलला आराखडा, जाणून घ्या या भागांना होणार फायदा

मेट्रो-5 च्या फेज-2 चे काम एकाच वेळी होणार, ठाणे-भिवंडी-कल्याणमधील प्रवाशांना फायदा
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो-5 कॉरिडॉरच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामाच्या आराखड्यात बदल केला आहे.

दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम आता दोन टप्प्यांऐवजी एकाच वेळी होणार आहे. एमएमआरडीएने यापूर्वी कॉरिडॉरचा भूमिगत मार्ग आणि उन्नत मार्ग स्वतंत्रपणे बांधण्याची योजना आखली होती. मात्र काही दिवसांपूर्वी भुयारी मार्गाला शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर प्राधिकरणाने आराखड्यात बदल केला आहे.

एमएमआरडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भूमिगत मार्ग आणि उन्नत मार्ग तयार करण्यासाठी स्वतंत्र निविदांऐवजी, बांधकाम सुरू करण्यासाठी एकच निविदा काढली जाईल. यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच वेगाने काम करणे शक्य होणार आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे गेल्या चार वर्षांपासून भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम रखडले होते. विरोधामुळे वादग्रस्त मार्ग वगळता उर्वरित मार्गावर बांधकाम सुरू करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता.

ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान मेट्रो-5 कॉरिडॉर तयार होत आहे. ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर भिवंडी ते कल्याण दरम्यान अद्याप काम सुरू झालेले नाही.

लोकांचा विरोध लक्षात घेऊन एमएमआरडीएने 24.9 किलोमीटरच्या एलिव्हेटेड मार्गापैकी सुमारे 3 किमी भूमिगत करण्याचा निर्णय घेतला होता. एमएमआरडीएने भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.

काही दिवसांपूर्वीच सरकारने एमएमआरडीएच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर शासनाच्या मान्यतेनंतर लवकरच बांधकाम सुरू करण्याच्या तयारीलाही प्राधिकरणाने वेग दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा