Advertisement

सायनवासीयांसाठी नवीन एस्केलेटरसह पादचारी पूल उपलब्ध

विशेष म्हणजे, शहरात प्रथमच सरकते जिने असलेला हा पादचारी पूल असून लवकरच हिमालय पुलाला सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.

सायनवासीयांसाठी नवीन एस्केलेटरसह पादचारी पूल उपलब्ध
SHARES

सायन रुग्णालयाआधी मुंबई महापालिकेने सरकते जिने असलेला भक्कम पादचारी पूल बांधला आहे. हा पूल लवकरच सायनवासियांच्या सेवेत येणार आहे. या पादचारी पुलामुळे रस्ते अपघात टाळणार असून हा पादचारी पूल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा कोटी रुपये खर्च केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील रस्ते अपघात टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्कायवॉक, उड्डाणपूल, पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. सायन रुग्णालयाआधी रस्ता ओलांडून लोकांना पूर्व-पश्चिम दिशेला ये-जा करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी मुंबई महापालिका प्रशासनाकडे चार वर्षांपूर्वी केली होती.

सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर पूल तयार झाला असून पुढील महिनाभरात हा पूल सायनवासियांच्या सेवेत येईल, अशी माहिती भाजपच्या प्रभाग क्रमांक १७२ च्या माजी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर दिली.

सायन पूर्व स्थानक येथून सायन रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पादचारी पूल नसल्याने सायन परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागते. सायन परिसरात महाविद्यालय, शाळा असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. तसेच सायन रुग्णालयात जाण्यासाठी लोकांना वळसा घालून जावे लागते.

सायन रुग्णालयाआधी पादचारी पूल बांधण्यात यावा, जेणेकरून रस्ते अपघात होणार नाहीत आणि सायन पूर्व व पश्चिमेकडील नागरिकांना पादचारी पूल उपलब्ध झाल्याने त्यांना दिलासा मिळेल, यासाठी चार वर्षे झाली पाठपुरावा करत होते. अखेर पूल पूर्ण झाला असून पुढील महिनाभरात पूल नागरिकांच्या सेवेत येईल, असे शिरवाडकर यांनी सांगितले.

सायन रुग्णालयाआधी पादचारी पूल बांधण्यासाठी १ मार्च २०१९ मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली होती. या पुलाच्या कामासाठी ५ कोटी १६ लाख रुपये खर्च आला असून लवकरच नागरिकांसाठी पूल खुला करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, शहरात प्रथमच सरकते जिने असलेला हा पादचारी पूल असून लवकरच हिमालय पुलाला सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.



हेही वाचा

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे 17 महिन्यांत केवळ 20 टक्केच काम पूर्ण

वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे नामकरण वीर सावरकर सेतू करण्यात आले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा