निवडणूक काळात बेकायदेशीर दारू रोखण्यासाठी अतिरिक्त ४० चौक्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबर देशात आचार संहिताही लागू झाली आहे. पोलिसांनीही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईत प्रवेश करण्याच्या सीमेवर पोलिसांनी अतिरिक्त ४० चौक्या स्थापन केल्या आहेत. निवडणूक काळात बेहिशोबी पैसा, बेकायदेशी रदारूची वाहतूक रोखण्यासाठी या चौक्या तयार करून या ठिकाणी पुरेसा पोलिस फौजफाटा ठेवल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. या चौक्या २४ तास सुरू राहणार आहेत. 

अबकारी विभागाशी समन्वय

निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचं वाटप मोठ्या प्रमाणावर केलं जातं.  दारूची विक्री आणि आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिस आणि अबकारी विभाग संयुक्त कारवाई करत आहे. निवडणूक काळात काळा पैसा आणि बेकायदेशीर दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आतापासून मोठी तयारी सुरू केली आहे. 

दारूचा कंटनेर पकडला

अबकारी विभागाने नुकतंच मुंबई - नाशिक महामार्गावर शहापूरजवळ एक कंटेनर पकडला आहे. या कंटेनरमधून मध्य प्रदेशमधून देशी दारूची तस्करी केली जात होती. या जप्त दारूची किमत ५१ लाख रुपये आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक करत एक कारही जप्त केली आहे. या कारमधूनही दारूची वाहतूक केली जात होती. 


हेही वाचा - 

हिमालय ब्रिज दुर्घटनेनंतर वाहतूक मार्गात बदल

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना


पुढील बातमी
इतर बातम्या