Advertisement

हिमालय ब्रिज दुर्घटनेनंतर वाहतूक मार्गात बदल

हिमालय ब्रिज दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून ही वाहतूक पी. डिमेलो मार्ग आणि मेट्रो जंक्शनकडून पोलिस आयुक्तालय मार्गाद्वारे पुन्हा जे.जे. उड्डाणपूलाखालून सुरू करण्यात आली आहे.

हिमालय ब्रिज दुर्घटनेनंतर वाहतूक मार्गात बदल
SHARES

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला जोडणारा हिमालय ब्रिज गुरूवारी संध्याकाळी ७.३० वा. च्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. रात्री उशिरपर्यंत या ब्रिजचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू होतं. या कामाकरीता या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली असून ही वाहतूक पी. डिमेलो मार्ग आणि मेट्रो जंक्शनकडून पोलिस आयुक्तालय मार्गाद्वारे पुन्हा जे. जे. उड्डाणपूलाखालून सुरू करण्यात आली आहे.


वाहतूक वळवली

मुंबईत हिमालय उड्डाणपूल दुर्घटनेनंतर त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी पूर्व मार्गावरील वाहतूक पी. डिमेलो मार्गावरून, घोडीबंदरद्वारे फ्री-वे मार्गे सुरूळीत सुरू केली आहे. तर पश्चिम मार्गावरील वाहतूक ही पालिका मुख्यालय मार्गावरून मेट्रो जंक्शन-पोलिस आयुक्तालयामार्गे पुन्हा जे.जे. उड्डाणपुलाखालून मोहम्मद अली रोडमार्गे सुरू केली असल्याची माहिती वाहतूक पोलिस सह-आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.


मार्ग बंदच

संबधित पुलाचा उर्वरित सांगाडा पाडण्याचं काम सुरू असेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. या दरम्यान परिसरात कोणतीही वाहतूककोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी स्थानिक वाहतूक पोलिस अधिकारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं अमितेशकुमार यांनी सांगितलं.


आदेशांतरच वाहतूक पूर्ववत

हा ब्रिज पाडण्याचं काम किंवा संबधित अधिकाऱ्यांनी मार्ग सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरच दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.




हेही वाचा -

सीएसएमटी पूल दुर्घटना : महापालिका, रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा