Advertisement

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना

मुंबईत मागील दीड वर्षात २ पादचारी पूल कोसळले तर एका पुलावर चेंगराचेगरीच्या घटनेमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबईकर जीव धोक्यात घालून करतात प्रवास, दीड वर्षात ३ पूल दुर्घटना
SHARES

मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जातं. मात्र, मुंबईमधील लोक दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. कारण मुंबईमध्ये कधी कोणती दुर्घटना घडेल याची कोणालाच जाणीव नसते. मुंबईत मागील दीड वर्षात २ पादचारी पूल कोसळले तर एका पुलावर चेंगराचेगरीच्या घटनेमुळे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.


दीड वर्षात ३ पूल दुर्घटना

२९ सप्टेंबर २०१७ मध्ये एल्फ्निस्टन या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात भर नवरात्रीच्या दिवसात चेंगराचेंगरी होऊन २३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले होते. तर ३ जूलै २०१८ रोजी अंधेरी स्थानकातील गोखले पूलाचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या दोन पादचाऱ्यांचा रुळावर पडून मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. तसंच गुरुवारी रात्री ७.३० च्या सुमारास सीएसएमटी स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळला असून या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यात ३१ जण जखमी झाले आहेत.


६ पूलांची दुरुस्ती

दरम्यान, अधेरीतील गोखले पूलाच्या दर्घटनेनंतर मुंबईतील तब्बल ४४५ पादचारी पूलांची तपासणी केली जात आहे. यामध्ये मलाड पादचारी पूल, टिळकनगर पादचारी पूल, गोखले पूल, घाटकोपर, कलानगर या पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पुलाचे नाव नसल्याचं समजतंय. त्यामुळे गेल्या दीड वर्षात मुंबई ही तीन मोठ्या पूल दुर्घटनांनी हादरली आहे.



हेही वाचा -

राजामौलींसाठी आलिया बनणार सीता!

सीएसएमटी पूल दुर्घटना : महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा