Advertisement

राजामौलींसाठी आलिया बनणार सीता!

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली सध्या आपल्या आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. 'आरआरआर' असं शीर्षक असलेल्या या सिनेमासाठी आलिया भट्टनंही होकार दिला आहे.

राजामौलींसाठी आलिया बनणार सीता!
SHARES

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली सध्या आपल्या आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. 'आरआरआर' असं शीर्षक असलेल्या या सिनेमासाठी आलिया भट्टनंही होकार दिला आहे.


युवा टायगर

राजमौलींच्या 'आरआरआर'मध्ये अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. दक्षिणेकडे युवा टायगर म्हणून ओळखला जाणारा ज्युनियर एनटीआर आणि मेगा पॅावरस्टार राम चरण देखील या सिनेमात मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या सिनेमात अजय बॅक फुटवर म्हणजेच फ्लॅशबॅकमध्ये दिसणार असल्याचं समजतं.  तर ज्युनियर एनटीआर आणि राम चरण फ्रंट फूटवर बॅटिंग करताना दिसतील. 'बाहुबली'प्रमाणेच राजामौलींचा हा सिनेमाही बिग बजेट आणि भव्य दिव्य असल्याचं समजतं.


स्वातंत्र्यसैनिकांची कथा 

'आरआरआर'मध्ये अल्लूरी सीतारामराजू आणि कोमाराम भीम या वास्तवातील स्वातंत्र्यसैनिकांची काल्पनिक कथा पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोमाराम भीमची भूमिका ज्यु. एनटीआर, तर अल्लूरीची व्यक्तिरेखा राम चरण साकारत आहे. या सिनेमात आता आलिया भट्टचीही एंट्री झाली आहे. आलियानं नुकताच या सिनेमात काम करायला होकार दिला आहे. आलिया या सिनेमात राम चरणसोबत दिसणार आहे.


कथा १९२० ची

प्रथमच राजमौलींसोबत काम करण्याबाबत आलिया म्हणते की, राजमौली सरांसोबत काम करणं ही माझ्या बकेट लिस्टमधील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारं आहे. त्यासोबतच राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबत काम करणं हा देखील मी एक प्रकारे गौरवच मानते. हा अनुभव घेण्यास आणि प्रथमच दक्षिणात्य सिनेमात काम करण्यास खूपच उत्सुक आहे. महिन्याभरातच मी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. मी यात सीता नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमाची कथा १९२० च्या पार्श्वभूमीवर घडणारी आहे.


शीर्षक प्रेक्षकांच्या पसंतीवरून

'आरआरआर' हा सिनेमा बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये बनणार आहे. यातील प्रत्येक भाषेत सिनेमाचं शीर्षक भिन्न असेल. यासाठी राजामौलींनी चाहत्यांकडून मदत मागितली आहे. याचाच अर्थ या सिनेमाचं प्रत्येक प्रादेषिक भाषेतील शीर्षक प्रेक्षकांच्या पसंतीवरून ठरवण्यात येणार आहे. यासाठी राजामौली यांनी तसं आवाहनही केलं आहे. ३० जुलै २०२० रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा -

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करा ऑनलाईन तक्रार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा