Advertisement

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करा ऑनलाईन तक्रार

यंदा आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन होण्यासाठी निवडणूक आयोग सी-व्हिजिल (cVigil) हे नवे मोबाइल ॲपचा वापर करणार आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करा ऑनलाईन तक्रार
SHARES

यंदा आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक आणि आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन होण्यासाठी निवडणूक आयोग सी-व्हिजिल (cVigil) या मोबाईल ॲपचा वापर करणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. त्यामुळं मतदारांना पैसा, मतदारांना मारहाण, दमबाजी, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक अशा विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणांच्या तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर  करता येणार आहेत.


ऑनलाईन तक्रार

'सिटीझन व्हिजिलन्स' अंतर्गत हे ॲप सुरू करण्यात आले असून, नागरिकांना तक्रारीचे छायाचित्र किंवा व्हिडीओ पुरावा म्हणून अपलोड करता येणार आहे. लोकसभा निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन न झाल्यास नागरिकांनी या घटनेचे फोटो किंवा व्हिडीओ काढावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो, व्हिडीओ या ॲपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाइलवर एक युनिक आयडी येईल. तसंच, ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सी-व्हिजिल ॲपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसंच, या ॲपमध्ये मोबाईल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील पाठवले जात नाही. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याने केलेल्या तक्रारीवर कारवाई केली जाते. 

ॲपवर तक्रार अपलोड केल्यानंतर पुढील दीड तासात तक्रारदाराला तक्रारीची माहिती मिळेल. त्यानंतर तक्रार बरोबर असल्यास तक्रारदाराच्या मोबाइलवर तसा संदेश पाठवला जाईल. या ॲपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. 



हेही वाचा -

कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा