Advertisement

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसने बुधवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावंदेखील जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसनं बुधवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या २१ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावंदेखील जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा आणि गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


नागपुरमधून नाना पटोलेंना उमेदवारी

काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतदारसंघांचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसने पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत ५ उमेदवार महाराष्ट्रातील आहेत, तर उर्वरित १६ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. त्याशिवाय कॉग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात माजी खासदार नाना पटोले यांना रिंगणात उतरविलं आहे. त्यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत पाहायला मिळणार आहे.


उत्तर प्रदेशातील उमेदवार

कॉग्रेसच्या उत्तर प्रदेशातील जागांवर नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 


काँग्रेसची पहिली यादी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ७ मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत १५ उमेदवारांची नावं होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून, तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याशिवाय जाहीर केलेल्या पहिल्या यादीत १५ जागांपैकी ११ जागा उत्तर प्रदेशातील तर, ४ जागा गुजरातमधील होत्या. 




हेही वाचा - 

भाजप-शिवसेनाने कॉंग्रेससाठी 'हक्काचे पाळणाघर' करू नये, शिवसेनेचा भाजपला सल्ला

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास करा ऑनलाईन तक्रार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा