१०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील - महापालिका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातील कोरोना रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारत सील करण्यात येत होती. इमारीतीमधील इतर रहिवाशी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांनंतर या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार इमारतीमधील ज्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळला असेल, तोच मजला सील करण्यात येत होता. मात्र, हळुहळू मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि प्रादुर्भाव कमी होत गेल्यानं महापलिकेनं या निर्णयात आणखी बदल केले. परंतु, सध्यस्थितीत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेनं १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील तर कटेन्मेंट झोनची संख्या ५६८ एवढी आहेत. ही कार्यवाही करतानाच पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा ओपीडी सुरू झाल्यास कोविडपश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

कोरोनासंदर्भातील विविध उपाययोजना, अडचणींचा आढावा घेताना मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वॉर्ड अधिकाऱ्यांनी रोज चर्चा करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या सूचना

  • सर्दी, खोकला, ताप असणाऱ्या रुग्णांवर अँटिजेन टेस्ट करावी. 
  • अँटिजेन टेस्टचा वापर टार्गेट ग्रुपवर केल्यास अधिक चांगले परिणाम येतील. 
  • सरकारी आणि खासगी इस्पितळात लक्षणं नसलेल्यांना बेड देण्यात येऊ नयेत. 
  • खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्यात याव्यात. 
  • पोस्ट कोविड ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत. 
  • अशा ओपीडी सुरू झाल्यास कोविड पश्चात रुग्णांची नेमकी माहिती मिळून त्यांच्यावर उपचार करता येतील. 
  • जंबो रुग्णालयांच्या आसपासच्या मोठ्या खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञांनी जंबो रुग्णालयांना मार्गदर्शन करावे. 
  • टेलिमेडिसीनसारखे उपक्रम राबवून कोरोना संक्रमणास रोखण्यासाठी शासन, पालिका प्रशासनास सहकार्य करावे. 
  • ज्या वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर अधिक आहे तेथे विशेष उपाययोजना राबविवाव्या.  


हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध


पुढील बातमी
इतर बातम्या