Advertisement

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

इमारतींमध्येही अतिजोखमीचे संपर्क शोधा, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम
SHARES

मुंबईत मार्च महिन्यात कोरोना व्हायरसनं शिरकाव केला. त्यानंतर हळुहळू मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. दररोज कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळं महापालिकेनं यावर नियंत्रण मिळविण्यासाठी 'चेस द व्हायरस' ही मोहीम राबवली. सुरूवातील झोपडपट्टयांमध्ये ही मोहीम राबवली असून, या मोहिमेअंतर्गत अतिजोखमीचे संपर्क शोधण्यात आले. त्यानुसार, आता इमारतींमध्येही अतिजोखमीचे संपर्क शोधा, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोमवारी महापालिका आयुक्तांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात मुंबईतील कोरोना रुग्णवाढीच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबईतील अतिजोखमीचे संपर्क शोधण्याची मोहीम मंदावली असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. सध्या मुंबईत जे रुग्ण सापडत आहेत ते उच्चभ्रू सोसायट्या, इमारती येथील रुग्ण सापडत आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा मुंबईत झोपडपट्टी भागातील रुग्ण सापडत होते, त्यावेळी अतिजोखमीचे संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले गेले. त्यामुळं तेथील संसर्ग आटोक्यात आला. तशीच मोहीम आता इमारतींमध्ये राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिली आहेत. झोपडपट्टीत जसे एका रुग्णामागे १५ संपर्क असं प्रमाण ठेवण्यात आलं होतं. तसंच, प्रमाण इमारतीतील एका रुग्णामागेही ठेवण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

एखाद्या इमारतीमध्ये कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती रुग्ण म्हणून सापडली तरी तिचे निकट संपर्क शोधण्यात अजिबात कसूर करू नका, अशी सूचना देण्यात आल्या आहेत. ती व्यक्ती गेल्या सात आठ दिवसात कुठे गेली होती, कोणाच्या संपर्कात आली होती याची सर्व माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची होणारी हानी घटली


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा