Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३३१ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (७ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३३१ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ३३१ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (७ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३३१ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २८,५४५ झाली आहे.

सोमवारी बेलापूर ६६, नेरुळ ३७, वाशी ६९, तुर्भे ३१, कोपरखैरणे ३८, घणसोली ५३, ऐरोली ३५, दिघामध्ये २ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६६, नेरुळ ७९, वाशी ८७, तुर्भे ४१, कोपरखैरणे ५३,  घणसोली ३८, ऐरोली ४६ आणि दिघामधील ६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४३५४ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६३३ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. नवी मुंबईत ४ हजार ३५८ खाटांची संख्या आता ५ हजार ३५८ वर पोहोचली आहे. वाशी येथील निर्यात भवन महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथेही १ हजार प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. तर आणखी तेराशे खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.



हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा