केईएममधील शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवस प्रचंड वाढ होत आहे. या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. परंतु, अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालत देखील कोरोनाच्या अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र, त्यांना ठेवण्यासाठी शवागारात जागा नसल्यानं मृत्यू ठेवायचे कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केईएम रुग्णालयात कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांचे दरदिवशी किमान २० ते २५ मृत्यू होत आहेत. त्यामुळं इतके मृतदेह ठेवायचे कुठे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. केईएममधील शवागारात मृतदेह ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्यानं शवागारा बाहेरील जागेत मृतदेह ठेवल्याचे चित्र समोर आलं आहे. यसंदर्भातील फोटो व्हायरल झाले आहेत.

केईएमच्या शवागारात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी ३६ पेट्या उपलब्ध आहेत. दरदिवशी कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांचे किमान २० ते २५ मृत्यू होतात. काही वेळेस नातेवाईक येण्यास उशीर लागल्यानं हे मृतदेह शवागारात ठेवले जातात. परंतु, त्यामुळं नव्यानं येणारे मृतदेह ठेवण्यास अडचण निर्माण होते. अशावेळेस शवविच्छेदन विभागातही मृतदेह जमिनीवर ठेवले जात असल्याचं समजतं.

३६ पैकी १० पेट्या या लहान बालकांसाठी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २६ पेट्याच उपलब्ध आहेत. रात्रीच्या वेळेस मृत झाल्यास दुसऱ्या दिवशी मृतदेह जाण्यास वेळ लागतो. अशा वेळेस मग व्हरांडय़ात ठेवण्याची वेळ येते.


हेही वाचा -

रेड झोनमध्येही दुकाने सुरू होण्याची शक्यता

व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग


पुढील बातमी
इतर बातम्या