Advertisement

रेड झोनमध्येही दुकाने सुरू होण्याची शक्यता

कोरोनामुळे (coronavirus) ठप्प झालेले उद्योगचक्र हळुहळु गतिमान होत आहे. सध्या राज्यात ५० हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत.

रेड झोनमध्येही दुकाने सुरू होण्याची शक्यता
SHARES

केंद्र शासनप्रमाणे राज्य शासन देखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना (MSME industeries in maharashtra will get stimulus package) मदत करण्याचं नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न केला जाईल. रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत १ जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई (industries minister subhash desai) यांनी दिली.

५० हजार उद्योग सुरू

देसाई म्हणाले की, कोरोनामुळे (coronavirus) ठप्प झालेले उद्योगचक्र हळुहळु गतिमान होत आहे. सध्या राज्यात ५० हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत. ४३ हजार कारखान्यांनी परवाने मागितले आहेत. रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत १ जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, असंही देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा- महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सावरतोय- सुभाष देसाई

कामगारांना काम

औद्योगिक कामगार ब्युरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अवकुश मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे जिथं जिथं कामगारांची गरज भासेल त्याठिकाणी कामगारांचा पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची उद्योग विभागाकडे नोंद आहेत. त्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे.

परदेशी गुंतवणुकीसाठी

परदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीकडे ४० हजार हेक्टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असं आवाहन उद्योगमंत्र्यांनी केलं.

हेही वाचा - केंद्राने ठाकरे सरकारला दिले २८ हजार कोटी, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा