Advertisement

महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सावरतोय- सुभाष देसाई

रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. एकूणच महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सावरतोय. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सावरतोय- सुभाष देसाई
SHARES

सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये (green zone) पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार उद्योगांना राज्य सरकारच्या उद्योग विभागाने परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने (permission to start business and industries in green zone in maharashtra) सुरू झाले आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे साडेबारा लाख कामगार रुजू झाल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. वॉटर बॉटल असोशिएनच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये सुभाष देसाई (industries minister subhash desai) बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी उपस्थित होते.

रेड झोनमध्ये 'या' उद्योगांना परवानगी

याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे. परंतू रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. एकूणच महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सावरतंय. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन देखील  सुभाष देसाई यांनी केलं.

हेही वाचा - उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

उद्योगांना कर्ज दिलासा

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघू, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. या पॅकेजचा लघू उद्योजकांन लाभ घ्यावा. राज्य सरकार देखील लघु उद्योगांना सवलती देत आहे. विजेचे स्थिरदर रद्द करून जेवढा वापर होईल तेवढे दर आकारले जात आहेत. वॉटर बॉटल संघटनने देखील केंद्राच्या या पॅकेजचा लाभ घ्यावा, असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं.

पाणी उद्योगांचा दर्जा टिकवून वॉटर बॉटल संघटनेने आपली प्रतिमा अधिक शुद्ध व तेजस्वी करावी. केवळ पाणी उद्योगावर विसंबून न राहता इतर जोड उद्योग सुरू करावेत, असा सल्ला देखील सुभाष देसाई यांनी उद्योजकांना दिला.

हेही वाचा- महाराष्ट्रात उद्योग सुरू करा, सुभाष देसाई यांचं उद्योजकांना आवाहन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा