Advertisement

व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग

भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड (BPCL) कंपनीनं एक अनोखी संकल्पना राबवली आहे.

व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग
SHARES

देशभरात सध्या लॉकडाऊन लागू आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये अनेकांनी सिलिंडरसाठी लाईन लावलेले अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. आता भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड (BPCL) कंपनीनं यासाठी एक अनोखी संकल्पना राबवली आहे.

आता देशभरात घरबसल्या सिलिंडर बुक करता येऊ शकतात. Whatsapp चा वापर करून आपण सिलिंडर घरबसल्या बुक करू शकता. देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकावरची पेट्रोलियम वितरण कंपनी म्हणून BPCL ची ओळख आहे. याशिवाय ७.१० कोटी एलपीजी ग्राहक आहेत. मंगळवारपासून देशभरातील भारत गॅस (भारत गॅस) ग्राहक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करू शकतात, अशी घोषणा करण्यात आली आहे.


सिलिंडर बुक करण्याची प्रक्रिया?

कंपनीकडून BPCL स्मार्टलाइन नंबर देण्यात आला आहे. 1800224344 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि आपल्या मोबाईल नंबरच्या Whatsapp वरून या नंबरवर बुकिंगसाठी मेसेज करा.

बीपीसीएलचे मार्केटिंग संचालक अरुण सिंह म्हणाले, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एलपीजी बुकिंग करण्याची ही तरतूद ग्राहकांना अधिक सोयीस्कर वाटेल. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाकडे Whatsapp आहे. त्यामुळे यामध्यमाचा वापर करून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.


ऑनलाईन पेमेंट

ऑनलाईन पद्धतीनं याचे पेमेंट करण्यात येईल. whatsapp वरून बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना एक मेसेज येईल. त्यामध्ये एक लिंक दिलेली असेल. या लिंकवर जाऊन ग्राहकांना आपली पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एलपीजी डिलिव्हरीवर लक्ष ठेवणं आणि त्याबद्दल ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखीन नवीन योजना आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुविधा आणण्याच्या प्रयत्नात असल्याची कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

दहिसर, बोरिवलीमध्ये कोविड केअर केंद्र

१ आणि २ जूनला राज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा