कोरोनाचा फूल विक्रीला मोठा आर्थिक फटका

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत चालला असून, या जीवघेण्या कोरोनाचा फटका फूल उत्पादक शेतकरी, फूल विक्रेते यांना बसला आहे. फूलांचा व्यवसाय असणाऱ्या अनेक विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. लॉकडाऊनपूर्वी दरदिवसाला बऱ्यापैकी व्यवसाय होत होता. परंतु, लॉकडाऊनच्या ३ महिन्यात व सध्यस्थितीत व्यवसाय कमी असल्यानं कामगारांना पगार देणं कठीण झालं आहे, अशी माहिती दादर येथील फूल विक्रेता रुग्वेद दुरासी यांनी दिली.

दादर येथील फूल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी मुंबईसह अनेक भागातून ग्राहत येत असतात. परंतू, लॉकडाऊनमुळं या फूल विक्रीला फटका बसला असून, मोठं आर्थिक नुकसानं झालं आहे. पहिल्यासारखा बाजार भावही मिळत नाही, अशी माहिती फूल विक्रेता वंदेश यानं दिली.

मुंबईतील सर्वात मोठ्या अशा दादर येथील मुंबई महापालिकेच्या स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे मंडई (फूल मार्केट) मधील बहुसंख्य दुकानं बंद असल्यानं फूल उत्पादक शेतकरी व फूल विक्रेत्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यांची दररोज सुमारे ८० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

दादर फूल मंडईमध्ये सुमारे ६५० परवाना धारक फूल विक्रेते आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर २० मार्चपासून ही मंडई बंद करण्यात आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर या मंडईमध्ये ८ जूनपासून फूलविक्रेत्यांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगसाठी १०० विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली होती.


हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या