लाॅकडाऊन ४.०: मिरा-भाईंदरमध्ये ‘या’ वेळेत सुरू राहतील दुकाने, बघा, नवीन वेळा…

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात देखील लाॅकडाऊन ४.० (lockdown 4.0) लागू झालं आहे. चौथ्या टप्प्यातील हा लाॅकडाऊन पुढील २ आठवडे म्हणजेच ३१ मे पर्यंत कायम असणार आहे. एका बाजूला मुंबईतील कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला असू मिरा-भाईंदर महापालिका (MBMC) क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. 

रविवारी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात १८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता ३३० वर पोहोचली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका २१ मे पर्यंत दुकानांसाठी नवीन वेळापत्रक आखून दिलं आहे. जेणेकरून गर्दी टाळता येईल.  

हेही वाचा - मिरा-भाईंदरमध्ये कोरोना हाॅटस्पाॅट वाढले, बघा कंटेन्मेंट झोन लिस्ट

मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या निर्देशानुसार शहरातील दुकाने पुढील वेळेत बंद/ सुरू राहतील.

आस्थापनावेळ
मासळी, मटण/चिकन विक्री करणारी स्थायी आस्थापनेतील दुकाने

१७/५/२०२० रात्री १२.०० वाजेपासून २१/५/२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

भाजीपाला व फळांची स्थायी दुकाने व मनपाने तात्पुरती सुरू केलेली भाजीपाला व फळांची दुकाने/ मार्केट -

१७/५/२०२० रात्री १२.०० वाजेपासून २१/५/२०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

अन्नधान्याची दुकाने (डी मार्ट, स्टार बाझार, बिग बाझार इ. शाॅपिंग माॅलसह) बेकरी इ. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने

उपरोक्त काळात दररोज सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू राहील.

अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटण व इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा (home delivery)

उपरोक्त काळात दररोज सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.

दूध व डेअरी आस्थापना

उपरोक्त काळात दररोज सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.

औषधांची दुकाने (फक्त औषधे विकण्याची मुभा असेल)

दररोज औषधांची दुकाने सकाळी ९.०० ते संध्याकाळी ९.०० वाजेपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत सुरू राहतील.

रुग्णालयातील (ज्या ठिकाणी आंतररुग्ण विभाग सुरू आहे, अशा ठिकाणी) औषधांची दुकाने २४ तास किंवा त्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याची मुभा असेल.

२४ तास सुरू ठेवण्याची परवानगी असलेल्या औषधी दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.

पिठाची गिरणी (आटा चक्की)

नेहमीप्रमाणे सुरू राहील.

मच्छिमार व्यवसाय

उपरोक्त काळात दररोज सकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत सुभाषचंद्र बोस मैदानालगत उत्तनकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात नसलेल्या रस्त्याचा अर्धा भाग व त्या लगतच्या फूटपाथवर फक्त मासळी विक्रीसाठी परवानगी राहील.

सदर बंद कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे शासकीय व निमशासकीय, मनपा व पोलीस कर्मचारी, रुग्णालयीन कर्मचारी व त्यांची वाहने तसंच अॅम्ब्युलन्स, सरकारी रास्त भाव दुकाने (rationing shop) जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणे (होलसेल व किरकोळ विक्रेते) महानगरपालिकेच्या हद्दीतील पेट्रोल, डिझेल, एलपीजी पंप, रुग्णालये, लॅबोरटरी, डायग्नोस्टिक सेंटर, बँक, एटीएम यांना सदर 'बंद' मधून वगळण्यात आलं आहे. 

तसंच दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी करायची अत्यावश्यक कामे उदा. रस्ते दुरूस्ती, अत्यावश्यक विकास कामे, पाणी पुरवठा इ. साठी लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामुग्री यांनासुद्धा 'बंद' मधून वगळण्यात आलं आहे.

या आदेशाचं उल्लंघन करणारी व्यावसायिक आस्थापना आणि दुकानदार मालक व्यक्ती यांच्यावर उपरोक्त अधिसूचनेमधील महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार भारतीय दंडसंहिता (४५ of १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल.     

हेही वाचा - मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २० हजार पार, राज्यात एकाच दिवसांत सर्वाधिक २३४७ नवीन रुग्ण
पुढील बातमी
इतर बातम्या