Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना हाॅटस्पाॅट वाढले, बघा संपूर्ण कंटेन्मेंट झोन लिस्ट

मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट देखील जारी केली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना हाॅटस्पाॅट वाढले, बघा संपूर्ण कंटेन्मेंट झोन लिस्ट
SHARES

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात देखील लाॅकडाऊन ४.० (lockdown 4.0) लागू झालं आहे. चौथ्या टप्प्यातील हा लाॅकडाऊन पुढील २ आठवडे म्हणजेच ३१ मे पर्यंत कायम असणार आहे. एका बाजूला मुंबईतील कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा आकडा ओलांडला असू मिरा-भाईंदर महापालिका (MBMC) क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे.

रविवारी मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात १८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता ३३० वर पोहोचली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका २१ मे पर्यंत दुकानांसाठी नवीन वेळापत्रक आखून दिलं आहे. जेणेकरून गर्दी टाळता येईल. सोबतच महापालिकेने शहरातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट देखील जारी केली आहे.

कंटेन्मेंट झोन लिस्ट पुढीलप्रमाणे:

 • Kanugo Estate
 • Meditya Heritage
 • Al Fateh Mension
 • Sagar Manthan
 • Narendra Park
 • Asmita Orchid
 • Shivsena Galli
 • New Sai Charan
 • New Sai Krupa
 • Shripati
 • Poonam Sagar
 • Avadh Bldg, Opp Raj Estate, Kashimira
 • Devdarshan CHS, Modi-Patel Road, Bhayander (W)
 • Kranti Nagar
 • Ganesh Deval Nagar

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली असून मुंबईनेही २० हजारांचा (२०,१५०) आकडा पार केला आहे. रविवार १७ मे रोजी दिवसभरात २३४७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात रविवारी ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढं होतं. ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतकं वाढलं आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होतं. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढं आहे.


हेही वाचा - 

पालिकेची नवी वर्गवारी, कंटेनमेंट झोननंतर आता सीलबंद इमारतीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा