Advertisement

पालिकेची नवी वर्गवारी, कंटेन्मेंट झोननंतर आता सीलबंद इमारती

आता एखाद्या इमारतीमध्ये एक रुग्ण किंवा संशयित रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण आढळल्यास ती इमारत वा तिचा काही भाग सील करण्यात येणार आहे.

पालिकेची नवी वर्गवारी, कंटेन्मेंट झोननंतर आता सीलबंद इमारती
SHARES

कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर मुंबई महापालिकेकडून तो संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात येत होता. मात्र, आता ज्या इमारतीत कोरोना सापडला असेल तर फक्त ती इमारतच किंवा तिचा काही भाग सील करण्यात येणार आहे. तो संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन घोषीत करून सील करण्यात येणार नाही. महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त सीलबंद इमारती ही आणखी एक वर्गवारी तयार केली आहे. या सीलबंद इमारतीत नियमांचे काटेकोरपालन करण्यासाठी सोसायटीचा सहभाग घेतला जाणार आहे. मुंबईत अशा १ हजार ११० सीलबंद इमारती असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे.

एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्यामुळे पोलीस आणि पालिकेचं मोठं मनुष्यबळ लागत होतं. मात्र, आता एखाद्या इमारतीमध्ये एक रुग्ण किंवा संशयित रुग्ण, लक्षणे नसलेले रुग्ण आढळल्यास ती इमारत वा तिचा काही भाग सील करण्यात येणार आहे. अशा इमारतींमधील व्यवस्थापकीय समितीला त्याची माहिती देण्यात येणार असून इमारतीतील अन्य रहिवाशांना संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहिती आणि मार्गदर्शन समिती सदस्यांना करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रात २ हजार ८०१ कंटेनमेंट झोन होते. आता सुधारित व संयुक्तिक पुनर्रचनेनुसार महापालिका क्षेत्रात ६६१ 'कंटेनमेंट झोन' घोषित करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील मार्गावर निर्बंध घालण्यात आले असून तेथे पोलीस तैनात  आहेत. मात्र आता तेथे पोलिसांबरोबरच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.


हेही वाचा -

अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा... 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा