COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

होम डिलिव्हरीचा झक्कास फायदा!एकाच दिवसात २० हजार जणांच्या घरी पोचली दारू


होम डिलिव्हरीचा झक्कास फायदा!एकाच दिवसात २० हजार जणांच्या घरी पोचली दारू
SHARES
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपर्यंत घरपोच मद्यविक्रीला अखेर राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी राज्यात तब्बल 20 हजार 585 जणांना घरपोच मद्यविक्रीची सेवा पुरवण्यात आली आहे.  राज्यातील 33 जिल्हयात सध्या आँनलाईन मद्यविक्री सुरू आहे. यात सर्वाधिक नोंद ही नागपूर आणि लातूर जिल्ह्यातील मद्यपींनी केल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 राज्यातील 33  जिल्ह्य़ांत ही घरपोच मद्यविक्री सुरू आहे. पुण्यात टोकन पद्धतीने मद्यविक्रीला परवानगी आहे. तर इतर जिल्ह्यात  घरपोच मद्यविक्री केली जात आहे.राज्यात 4159 देशी दारु विक्रीची दुकाने आहेत त्यापैकी 1938 दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात  विदेशी मद्यविक्रीची (वाईन शॉप) 1685 दुकानं पैकी 530 सुरु आहेत. बीअर शॉपची 4947 दुकाने असून त्यापैकी 2129 सुरु आहेत, अशा प्रकारे राज्यात 10 हजार 791 मद्यविक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी 4 हजार 597 सध्या स्थितीत सुरू आहेत. घरपोच मद्यविक्रीद्वारे या दुकानांमधून रविवारी तब्बल 20 हजार 585 जणांनी नोंदणी एका दिवसात केली आहे. ही सेवा सुरू झाली त्यावेळेस अवघ्या एका दिवसात नुसत्या नागपूर आणि लातूर मध्ये 4 हजार 875 जणांनी घरपोच मध्यखरीदीची इच्छा दर्शवली.


माञ शासनाने ही सेवा सुरू करून सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या दारूची विक्रीही केली जात आहे. अशांवर शुक्रवारी 74 गुन्हे नोंदवण्यात आले असून 38 आरोपींना एका दिवसात अटक केली आहे. तर लाँकडाऊन दरम्यान अवैध विक्री प्रकरणी 5 हजार 682 गुन्हे नोंदवण्यात आले असून 2 हजार 558 आरोपींना अटक केली आहे. तसेच या तस्करीसाठी वापरण्यात आलेली 576 वाहने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 15 कोटी 30 लाखंाची दारू हस्तगत केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा