Advertisement

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर


मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना नीती आयोगानं दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर आला असल्याची माहिती नीती अयोगानं रविवारी दिली असल्याचं महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.

रविवारी सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्तानी कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांनी सिंहाचा वाटा उचलला असून, सायन रुग्णालयातील रुग्ण तसेच रुग्णालयाची स्थिती कशी आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं म्हटलं.

रुग्णालयातील शवागारात जाऊन निर्धारित केलेल्या प्रणालीप्रमाणे काम होत आहे की नाही, याची पाहणी केली. तसंच, यापूर्वी मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढे केल्यास कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दुसऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येनं मुंबईत येत असून डॉक्टरांची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी म्हटलं. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येत्या मंगळवारपासून रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पालिकेचे काम सुरू असून त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ७ दिवसानंतर रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा -

देशव्यापी लाॅकडाऊन ४.० लागू, काय सुरू, काय बंद? वाचा नवे नियम…

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २० हजार पार, राज्यात एकाच दिवसांत सर्वाधिक २३४७ नवीन रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा