Advertisement

देशव्यापी लाॅकडाऊन ४.० लागू, काय सुरू, काय बंद? वाचा नवे नियम…

लाॅकडाऊन ४ ची नवीन नियमावली केंद्र सरकारच्या गृह विभागाने (Ministry of Home Affairs (MHA)) रविवार १७ मे रोजी रात्री जारी केली आहे.

देशव्यापी लाॅकडाऊन ४.० लागू, काय सुरू, काय बंद? वाचा नवे नियम…
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार अखेर देशव्यापी लाॅकडाऊन (lockdown 4) ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने  (National Disaster Management Authority (NDMA)) याबाबतची घोषणा केली. यासंदर्भातील नवीन नियमावली केंद्र सरकारच्या गृह विभागाने (Ministry of Home Affairs (MHA)) रविवार १७ मे रोजी रात्री जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार ३१ मे पर्यंत शाळा-कॉलेज बंदच राहणार असून मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चौथ्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन यासोबतच बफर आणि कंटेन्मेंट झोन असे ५ झोन पाडण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारच्या घोषणेआधीच महाराष्ट्र आणि तामिळनाडू सरकारने लाॅकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करतानाच लाॅकडाऊनचा पुढचा टप्पा १७ मे आधी घोषित करण्यात येईल, असं सांगितलं होतं. या वेळच्या लाॅकडाऊनचे नियम, अटी-शर्थी वेगळ्या असतील, असं देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीवर नजर टाकूया.

नवे नियम पुढीलप्रमाणे:

  • देशात रेड, ऑरेंज, ग्रीन, बफर आणि कंटेन्मेंट असे ५  झोन असतील
  • रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू 
  • ६५ वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि १० वर्षांखालील मुलांना अत्यावश्यक किंवा आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडण्यास मनाई
  • केंद्र सरकारकडून राज्य सरकारांवर जास्त जबाबदारी
  • बाजारपेठ उघडण्याच्या नियमांचा निर्णय राज्य सरकारकडे
  • आंतरराज्य बसेस चालवण्याचा निर्णय राज्य सरकारकडे
  • सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केल्यास कारवाई
  • लॉकडाऊनचं उल्लंघन करणं कायदेशीर गुन्हा
  • मास्क घालणं अनिवार्य राहील
  • लग्नात ५० पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही
  • अंतिम संस्कारात २० हून पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणं दंडनीय अपराध
  • किमान कर्मचारी कार्यालयात बोलवता येतील, पण थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक

हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय

काय सुरु राहील? (कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात अटी-शर्थींवर परवानगी)

  • होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार
  • पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
  • आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
  • राज्याने ठरवलेल्या जिल्हांतर्गत गाड्या आणि बस वाहतूक

काय बंद राहील?

  • डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील
  • मेट्रो सेवा बंद राहील
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहील, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
  • हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
  • सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडिटोरीअम, थिएटर, बार बंद राहील.  स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडण्यास परवानगी
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
  • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

हेही वाचा - सल्ला केंद्राला मिरची झोंबली दुसऱ्यांना, पृथ्वीराज चव्हाणांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन बंदी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा