Advertisement

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा (lockdown extends in maharashtra) तिसरा टप्पा रविवार १७ मे रोजी संपत असताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय
SHARES

केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा (lockdown extends in maharashtra) तिसरा टप्पा रविवार १७ मे रोजी संपत असताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi government) नुकत्याच झालेल्या बैठकीत ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यावर  सर्व नेत्यांचं एकमत झालं होतं. त्यानुसार हा निर्णय देखील अपेक्षितच होता. परंतु केंद्र सरकारच्या घोषणेआधीच ठाकरे सरकारने लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवल्याचा अध्यादेश जारी केला आहे. लॉकडाऊनबाबतचे नवे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्राच्या गाईडलाइन न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही नियमावली सोमवारी जाहीर करण्यात येईल, असं सूत्रांनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा - कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण

नेत्यांचं एकमत

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसंच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीत लाॅकडाऊन वाढवण्याविषयी प्रत्येकाचं मत विचारण्यात आलं, तेव्हा उपस्थित सर्वच नेत्यांनी लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात यावं, असं मत नोंदवलं होतं.

केंद्राआधीच घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करतानाच लाॅकडाऊनचा पुढचा टप्पा १७ मे आधी घोषित करण्यात येईल, असं सांगितलं होतं. या वेळच्या लाॅकडाऊनचे नियम, अटी-शर्थी वेगळ्या असतील, असं देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या लाॅकडाऊनच्या घोषणेनंतरच महाराष्ट्रातील लाॅकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. परंतु तसं न करता ठाकरे सरकारने केंद्राच्या आधीच राज्यातील लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. 

उद्योगांना सवलत

मात्र, या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये उद्योगधंद्यांना व इतर सेवांना कुठल्या सवलती देण्यात येतील, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. याबाबतचा निर्णय केंद्राचं परिपत्रक आल्यानंतरच घेण्यात येईल. तूर्तास तरी महाराष्ट्रातील उद्योग हळूहळू सुरू करण्याला राज्य सरकारचं प्राधान्य असेल. तर कटेंन्मेंट झोनमध्ये मात्र कुठलीही सवलत मिळणार नाही. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा