Advertisement

सल्ला केंद्राला मिरची झोंबली दुसऱ्यांना, पृथ्वीराज चव्हाणांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन बंदी

श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या व्यवस्थापनाने चक्क पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात येण्यावर आजीवन बंदी घातली आहे.

सल्ला केंद्राला मिरची झोंबली दुसऱ्यांना, पृथ्वीराज चव्हाणांना श्री काशी विश्वनाथ मंदिरात आजीवन बंदी
SHARES

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे (lockdown) अर्थव्यवस्था संकटात आलेली असताना केंद्र सरकारने देवस्थानांच्या ट्रस्टकडून सोनं कर्जरुपात (gold) ताब्यात घ्यावं आणि त्याबदल्यात ट्रस्टला व्याज द्यावं, असा सल्ला देणारे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला श्री काशी विश्वनाथ मंदिराला (kashi vishwanath temple varanasi) जराही रुचलेला नाही. इतका की या मंदिराच्या व्यवस्थापनाने चक्क पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात येण्यावर आजीवन बंदी घातली आहे.

सल्ला काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगधंद्यांना मदत म्हणून २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केल्यापासून काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी संकट काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जस्वरुपात ताब्यात घ्यावं, असा सल्ला दिला. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणण्यानुसार, देशात १ ट्रिलियन सोनं आहे. २-३ टक्के व्याजदरावर हे सोनं सरकारला कर्जरूपानं ताब्यात घेता येईल आणि कालांतरानं परत करता येईल, असं चव्हाण म्हणाले होते. 

हेही वाचा - देवस्थानाचं सोनं ताबडतोब ताब्यात घ्या, पृथ्वीराज चव्हाणांची केंद्राला सूचना

भाजपकडून टीका

परंतु या सल्ल्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला. काँग्रेसचा मंदिरात पडून असलेल्या सोन्यावर डोळा असल्याची टीकाही करण्यात आली. त्यावर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

माजी महंत संतापले

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात असलेल्या काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या महंतांना चव्हाण यांचं हे वक्तव्य जराही रुचलेलं नाही. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात १९८३ च्या काळात काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली होती. या चोरीत काँग्रेसनं  मुख्य भूमिका निभावली होती. एवढंच नाही, तर पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते पूर्वाग्रहानं ग्रासलेले आहेत, असं म्हणत काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी यांनी म्हंटलं.

हेही वाचा - कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा