पोलिसांना ४० हजार मास्कचं वाटप

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाल आळा घालण्यासाठी राज्यातील डॉक्टर, नर्स आणि पोलीस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाविरोधात लढा देताना आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाची लगाण झाली आहे. त्यामुळं आपलं कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी विराज प्रोफाइल्सनं मुंबई पोलिसांना ४० हजार मास्कचं वाटप केलं. मुंबई पोलीस मुख्यालयात वाटप केलं असून, यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.

'कोरोना व्हायरसमुळं उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार आणि विविध विभागांतर्फे करण्यात येणाऱ्या कामाबद्दल विराज ग्रुपतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई शहर आणि येथील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आघाडीवर असलेल्या मुंबई पोलीसांचे आम्ही विशेष आभार मानतो. आमचे हे सुपरहिरो सुरक्षित राहावे यासाठी आम्ही मास्कचं वाटप करत आहोत', अशी माहिती विराज प्रोफाइल्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज कोचर यांनी दिली.

आरोग्यसेवेला मदत करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून बोईसरमधील टीआयएमए रुग्णालयात ५ हजार मास्क्स आणि इतर साधनांचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच, बोईसरसह वसई, जव्हार, मोखाडा आणि पालघर भागांतील १२ हजार कुटुंबांना ५०० लिटरहून अधिक सॅनिटायझर आणि अन्नपाकिटांचं वाटप केलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी व चाचणी, कारखाने, प्रवासी व्यवस्था, कार्यालय यांचं निर्जंतुकीकरण, कर्मचाऱ्यांना नोझ मास्क आणि हँड सॅनिटायझरचे नियमित वाटप, शारीरिक अंतर राखणे इत्यादी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहेत. या साथीच्या रोगाशी लढा देण्यासाठी काय करावं व काय करू नये यासाठी जनजागती करण्यात येत आहे.


हेही वाचा -

दिलासादायक! अखेर 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून

रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, संसर्गाचा धोका


पुढील बातमी
इतर बातम्या