Advertisement

दिलासादायक! अखेर 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून


दिलासादायक! अखेर 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून
SHARES

मुंबईसह राज्यभरात १ जून रोजी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या पावसानं चांगलंच झोडपून काढलं. हवमान विभागानं चक्रीवादळासह राज्यात ८ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्यचा अंदाज वर्तवला होता. परंतु, चक्रीवादळानंतर पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली. केवळ हलक्या सरी कोसळत असून, यामुळं उकाड्यात आणखी वाढ होत आहे. परंतु, आता हवामान विभागानं मुंबईकरांना दिलासादायक बातमी दिली आहे. ती म्हणजे ११ जून रोजी मान्सूनच्या सरी मुंबईत कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक आणि गोवा ओलांडून तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसंच, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्यामुळं ६ राज्यात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

नियोजित वेळेला म्हणजे १ जूनला ते केरळमध्ये दाखल झाले होते. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागापर्यंत ते सहज पोहोचले होते. यंदा जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात १०२ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवमान विभागानं वर्तवला आहे. मागील २ दिवसांपासून मुंबईत मान्सून पूर्वी सरीमुळं मुंबईकरांना गरमीतून विसावा मिळाला आहे. आता ११ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होणार आहे.

सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सर्वत्र गारवा पसरला आहे. चक्रीवादळानंतर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा मुंबईत हजेरी लावल्यानं तापमानातही घट झाली आहे. आता मुंबईकरांना मान्सून प्रतिक्षा असून हवमाना विभागाच्या अंदाजानुसार मान्सून दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घटसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा