Advertisement

रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, संसर्गाचा धोका

कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांची प्रचंड गर्दी, संसर्गाचा धोका
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, आता अनलॉक १.० सुरू करण्यात आलं असून, अनेक सुविधा सुरू करण्यात येत आहेत. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

खासगी कंपन्यांची कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरु केली आहेत. तसंच, अन्य कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावं लागणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त खुली केली जाणार नाहीत. तसंच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचं निर्बंध कायम असणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कर्जतहून सोडण्यात आलेल्या ट्रेन, लोकलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचीही तोबा गर्दी झालेली पहायला मिळाली.

कल्याणहून सुटलेल्या लोकलमध्ये एका सीटवर एकच पाहिजे असा नियम असताना उभ्यानं प्रवास केला जात आहे. तर ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्स कसं ठेवायचं, असा सवाल त्रस्त कर्मचाऱ्यांनी केला. या गाडी मध्ये कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहेत. तसंच, बाहेरील माणसं सुध्दा चढतात. कोणी चेक करायला सुध्दा येत नाही. याची दखल घ्यावी, असेही रेल्वे कर्मचारी सांगत आहेत.



हेही वाचा -

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा