मुंबईत कोरोनाचे २२६१ नवे रुग्ण, ४४ जणांचा दिवसभरात मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात रविवारी कोरोने ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत रविवारी दिवसभरात २२६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रविवारी दिवसभरात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत रविवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४४ रुग्ण दगावले आहेत. तर २५ सप्टेंबर रोजी ४८ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २६ सप्टेंबर रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २२६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ९८ हजार ७२० इतकी झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ४१९० जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ६२ हजार ९३९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-प्लाझ्मा बॅगचा दर निश्चित, प्रति बॅग साडेपाच हजार रुपयांना

दरम्यान, कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या