Advertisement

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

मुंबईतील हे पहिलं प्रकरण असून यामुळे अधिक चिंता वाढली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस
SHARES

एखाद्या व्यक्तीला एकदा कोरोनाव्हायरस (coronavirus reinfection) झाल्यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. असंच एक प्रकरण मुंबईत आढळलं आहे. मुंबईतील हे पहिलं प्रकरण असून यामुळे अधिक चिंता वाढली आहे.

मुंबईतील सायन रुग्णालयातील डॉक्टरला पुन्हा कोरोना झाला आहे. सायन रुग्णालयातील अनेस्थिशिया विभागातील ही महिला डॉक्टर आहे, जी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. दोन महिन्यांपूर्वी या डॉक्टरला कोरोना झाला होता. पण काही दिवसांपूर्वी उपचार घेऊन डॉक्टर बरी झाली. पण आता पुन्हा एकदा तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसत आहेत.  

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुक्त झालेल्या या डॉक्टरमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं पुन्हा दिसून आली. चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. काही दिवसांसाठी डॉक्टरला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे शरीरात आता अँटिबॉडी आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीरात पुरेशा अँटिबॉडी नसतील तर कोरोनाची पुन्हा लागण होऊ शकते.

इंडियन मेडिकल काऊन्सिल रिसर्च (ICMR) नं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील इम्युनिटी पाच-सहा महिने ते काही वर्षांपर्यंत टिकून राहू शकते, असं वेगवेगळ्या अभ्यासात दिसून आलं आहे.

पण अहमदाबादमध्ये अभ्यासात समोर आलं आहे की, कोरोनामुक्त झालेल्या ४० टक्के रुग्णांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज संपल्याचं आढळलं आहे. अशा रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. कोरोनामुक्त झालेल्या १ हजार ८०० रुग्णांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला.



हेही वाचा

मुंबई-ठाण्याहून सरकणारा कोरोना संसर्ग चिंताजनक- उद्धव ठाकरे

राज्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा