Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला

मुंबईत मागील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला
SHARES

मुंबईत मागील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, आता मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला आहे. तसंच रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. मुंबईतील नऊ विभागांतील रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे.  

मुंबईतील रोजचा रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८ टक्के होता. तो गुरुवारी पुन्हा एकदा ०.९ टक्क्यांवर आला आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा कालावधीही ८० दिवसांवरून ७६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. वांद्रे पश्चिम, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, कांदिवली,नानाचौक-ग्रँटरोड, कुलाबा, गिरगाव-मुंबादेवी, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम या भागांमधील रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. या विभागांमधील रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे.

बुधवारी मुंबईत १६२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ५६९ झाली आहे. तर ८३८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत १ लाख १९ हजार ७०२  रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २०,८१३ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतील एकूण मृतांची संख्या ७७२४ वर गेली आहे.

मुंबईत आतापर्यंत ७ लाख ७५ हजार ९७४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. दर दिवशी नऊ हजारांहून अधिक चाचण्या होत आहेत. मुंबईत ५७७ कंटेन्मेंट झोन म्हणून पालिकेनं घोषित केले आहेत. तर मुंबईतील ६ हजार २९३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा