Advertisement

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम

महापालिकेच्या जी उत्तर विभागानं मलेरियाविरोधातही धडक मोहीम सुरू केली आहे.

दादर, माहीम, धारावीत मलेरियाविरोधात महापालिकेची विशेष मोहीम
SHARES

मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळुहळू नियंत्रणात येत आहे. कोरोनाला संपुर्णपणे नष्ट करण्यासाठी डॉक्टर, नर्स, शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, असं असलं तरी मागील अनेक दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळं साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. विशेषत: 'मलेरिया'. परंतु, सध्या कोरोनाबाबत सातत्यानं सुरू असलेल्या चर्चा आणि समाज माध्यमांवरील संदेशांमुळं निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या वातावरणामुळं अनेक जण मलेरियावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या जी उत्तर विभागानं मलेरियाविरोधातही धडक मोहीम सुरू केली आहे.

जी उत्तर विभागात मलेरियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यात ३ हजार ९१५ जणांच्या रक्ताचं नमुने गोळा केल्यानंतर मलेरियाचे ८२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तातडीने सहा ठिकाणी तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली असून, मलेरियाच्या चाचण्यांतही वाढ करण्यात आली आहे.

मात्र, असं असतानाही अनेक जण दवाखान्यात जाण्यासाठी मनात भीती बाळगत आहेत. त्यामुळं त्यांची भीती दुरू करून त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी जी उत्तर विभागात कोरोना चाचणी केंद्राप्रमाणे मलेरिया चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या चाचणी केंद्रात मोफत मलेरियाची तपासणी केली जात आहे. त्याशिवाय, डॉक्टरांचं विशेष पथक तयार करण्यात आलं असून, हे डॉक्टर रुग्णांना योग्यरित्या मार्गदर्शन करत आहेत.

हेही वाचा - विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

महापालिकेच्या जी उत्तर विभागातील अनेक भागांत पावसाळी साथीचा आजार असलेल्या मलेरियानं डोकं वर काढल्यानं मलेरियाविरोधात बुधवारपासून मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम रेतीबंदर, रामगड, कापड बाजार, स्टार मॉल, उपेंद्रनगर तसेच अब्दुल गनी चाळीत राबवली जात आहे. या मोहिमेच्या पहिल्यादिवशी म्हणजे बुधवारी रेतीबंदर आणि रामगड इथं केलेल्या तपासणी शिबिरामध्ये १२५ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये ५ जणांना मलेरिया झाल्याचे निदान झाले आहे. दादर सार्वजनिक मंडई आणि प्लाझा भाजी मार्केटमध्येही तिघांना मलेरिया झाल्याचे आढळले आहे.

हेही वाचा - मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण

या मोहिमेर्तंगत गुरूवारी माहिम येथील कपडा बाजार, पारकर वाडी, केशव वाडी, धोबी घाट या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. ४१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून, यामध्ये एका व्यक्तीला मलेरियाची लागण झाल्याचं निदर्शास आलं. स्टार मॉल, केळकर वाडी, आरधाना बिल्डिंग, गणेश पेठ लेन या ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये ४४ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून ४ जणांना ताप असल्याचं निदर्शनास आलं.

या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊनही मलेरियाची तपासणी केली जात आहे. त्यानुसार, गुरूवारी राजमाह बिल्डिंग आणि क्रांती नगर येथील ३१ रहिवाशांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. प्रकाश नगर येथील ३२ रहिवाशांची तपासणी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून मशिद गल्ली, भवानी शंकर रोड या परिसरात २८ जणांची आणि गुलमोहम्मळ येथील २३ रहिवाशांची तपासणी करण्यात आली.

कोरोना हळुहळू नियंत्रणात येत असला तरी मुंबईकरांच्या मनातील भीती अजून कायम आहे. सध्या मलेरियाचे रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी मलेरिया तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय, घरोघरी जाऊनही तपासणी केली जात आहे. या मोहिमेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मलेरियाची तपासणी केल्यावर तपासणी अहवाल काही तासानं मिळतो. त्यामुळं तातडीनं मिलेरियाबाबत माहिती मिळावी यासाठी रॅपिड टेस्ट केली जात आहे.

- तुषार लाड.


रॅपिड टेस्ट

रॅपिड टेस्टसाठी एका विशेष कीटचा वापर केला जात असून या कीटमध्ये संबंधित व्यक्तीच्या रक्ताचे नमुने आणि ३ थेंब सल्युशन टाकलं जातं. यामुळं तातडीनं या वक्तीला मलेरियाची लागण झाली आहे की नाही, याबाबत माहिती मिळते. ही कीट प्रथमच वापरली जात असल्याची माहिती डॉ. तुषार लाड यांनी दिली.



हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची गरज

NEET-JEE परीक्षा नकोच! महाराष्ट्रासह ६ राज्यांची सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा