दरवर्षी मुंबईत पावसाळा सुरु होताच साथीचे आजार डोकं वर काढतात. मलेरिया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांमुळं नागरिक त्रस्त असतात. यंदाही पावसानं मुंबईत हजेरी लावल्यानंतर साथीच्या आजारांचे रुग्ण अडळत आहेत. जून महिन्यात शहरात ३०० मलेरियाचे, ४ डेंग्यू आणि १ लेप्टोस्पायरोसिसचा रुग्ण आढळला आहे. मे महिन्यामध्ये १६३ हिवतापाचे रुग्ण आढळले होते, तर एक लेप्टो आणि सहा डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.
यंदा साथीच्या आजरांसह कोरोनाचं संकट मुंबईकरांवर आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळं सध्या रुग्णालयात अशी लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या कोरोनासह या पावसाळी आजारांच्याही चाचण्या केल्या जातात. त्यामुळे योग्य निदान होण्यास मदत होते आणि उपचारही त्या पद्धतीने सुरू केले जात आहेत.
२०१९ च्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे नोंदले गेले. मात्र जूनमध्ये मे महिन्याच्या तुलनेत पुन्हा रुग्णसंख्येमध्ये दुपटीने वाढ झाली. २०१९ ला याच काळात मलेरियाचे ३१३ रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षांच्या तुलनेत डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्ण कमी प्रमाणात आढळल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
मलेरिया-कोरोना, मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाचा असे दुहेरी,तिहेरी संसर्ग झाल्याचे ही काही रुग्ण आढळून येत आहेत. एकापेक्षा अधिक संसर्ग एकाच वेळेस झाल्याने प्रकृती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिन्हीवरील उपचार दिले जात असले तरी धोका हा आहेच. तेव्हा ज्याप्रमाणे करोना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.
साथीच्या आजारांची रुग्णसंख्या
वर्ष ताप डेंग्यू लेप्टो
मे २०१९ २८४ ६ १
मे २०२० १६३ ३ १
जून २०१९ ३१३ ८ ५
जून २०२० ३२८ ४ १
हेही वाचा -
कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण
दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक