Advertisement

लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची गरज

लोकल सुरू केल्यावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होणार आहे.

लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याची गरज
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांखाली सुरू असलेली लोकल लवकरच पूर्वपदावर येण्याची संकेत मिळत आहेत. लोकल सुरू झाल्यास अनेकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, लोकल सुरू केल्यावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मुंबईतील कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होणार आहे.

रेल्वेनं पुढाकार घेतला असून लवकरच या मुद्यावर राज्य सरकार, महापालिका यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं जूनमध्ये रेल्वे प्रवासातील ठरावीक वेळेस होणारी गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याबाबत राज्य सरकार, महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या एकत्रित बैठकीत चर्चा झाली होती.

'सामान्यांसाठी लोकल सुरू करायची असल्यास ठरावीक वेळेस होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्याशिवाय पर्याय नसेल. एकत्रित बैठकीत तसा निर्णय झाल्यास रेल्वे त्या दृष्टीने तयारी सुरू करेल', अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सत्याकु मार यांनी बुधवारी वेब संवादात दिली.

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक असून, सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी हा प्रवास जीवघेणा ठरतो. त्यामुळं हा प्रवास सुकर होण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यासंदर्भात मागील अनेक वर्षे चर्चा सुरू आहे.



हेही वाचा -

राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास लोकल होणार सुरू

‘ही’ केंद्राची जबाबदारी, जीएसटी परिषदेत अजित पवार आक्रमक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा