Advertisement

राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास लोकल होणार सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा मागील ५ महिन्यांपासून सामान्यांसाठी बंद आहे.

राज्य सरकारनं हिरवा कंदील दिल्यास लोकल होणार सुरू
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 'लोकल सुरू करण्याबाबात लवकरच उत्तर मिळू शकते', असे संख्येत मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसंच, राज्य सरकारनं परवानगी दिल्यास मुंबईतील लोकल वाहतूक सुरू करण्याची तयारी असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा मागील ५ महिन्यांपासून सामान्यांसाठी बंद आहे.

लोकलसेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडं करायला हवी. ती मागणी रेल्वे मंत्रालयानं मान्य केली व तसे आम्हाला कळवल्यास सरकारनं सांगताच आम्ही लोकलसेवा सुरू करू', असं गोयल यांनी स्पष्ट केलं.

सध्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या सुरू आहे. मात्र, कंपन्या व कार्यालयं सुरू झाल्यानं नियमावली निश्चित करून लोकलसेवा पूर्ववत करावी व प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

देशात अनलॉकचा चौथा टप्पा १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून या टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे. यामध्ये शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जाणार असल्याचं समजतं. त्याशिवाय, लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन, सिंगल स्क्रीन थीएटर, ऑडिटोरियम सुरू करण्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी गाइडलाइन्स निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा, पंतप्रधान मोदींनाच पत्र

‘ही’ केंद्राची जबाबदारी, जीएसटी परिषदेत अजित पवार आक्रमक


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा