Advertisement

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता

१ सप्टेंबरनंतर राज्य सरकार लॉकडाउनमधील उरले सुरले निर्बंध हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सप्टेंबरमध्ये लोकल सुरू होण्याची शक्यता
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. सुरूवातीचे ३ महिने राज्यात लॉकडाऊन होतं. परंतु, लॉकडाऊनमुळं दुकानदार, व्यावसायिक आणि हातावर पोट असलेल्यांवर आर्थिक संकट ओढावलं. अशातच अनेकांचा रोजगार गेला तर, कोणाचं घर उद्ध्वस्त झालं. त्यामुळं नागरिकांना यामधून दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. राज्यात टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन करण्यात आलं, त्याचप्रमाणां टप्प्याटप्प्यात अनलॉक करण्यात येत आहे. त्यानुसार, दुकानं, व्यवसाय, मॉल, वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. परंतु, सामान्यांसाठी आजूनही काही सुविधांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळं गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर म्हणजे १ सप्टेंबरनंतर राज्य सरकार लॉकडाउनमधील उरले सुरले निर्बंध हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॉकडाऊनमधील निर्बंध हटवण्याची शक्यता असल्यानं सप्टेंबरमध्ये लोकलसेवेच्या फेऱ्या वाढवून तसेच प्रवाशांची संख्या मर्यादित ठेवून रेल्वेची सेवा सुरू करण्यासंदर्भातही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजते. दरम्यान, बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर २३ मार्चपासून निर्बंध आणण्यात आले होते. परिणामी आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होऊ लागल्यानंतर तसेच अर्थचक्राला गती मिळावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने जिल्हा, आंतरराज्यीय वाहतुकीवरची सर्व बंधनं उठवण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-पासचे नियम शिथिल करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुंबईची लाइफलाइन असलेली उपनगरी लोकलसेवा सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच सुरू असल्यानं लोकलच्या फेऱ्यांवर बरीच मर्यादा आहे. सरसकट उपनगरी लोकलसेवा खुली केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू करण्याचा निर्णय घेताना या सर्व बाबींचाही विचार करूनच निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं.



हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

भयंकर! महाडमध्ये ५ मजली इमारत कोसळली, १५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा