Advertisement

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे प्रवासाकडे पाठ

मध्य रेल्वेहून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुटणाऱ्या चार रेल्वेगाड्यांची अवघी १० टक्के आसनेच आरक्षित झाली आहेत.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे प्रवासाकडे पाठ
SHARES

गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या ३ महिन्या अगोदरच रेल्वेच्या तिकीटांचं बुकिंग चाकरमानी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळं रेल्वेनं कोकणात जाण अशक्य झालं आहे. अशातच, कोकणात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यासाठी विलगीकरणाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं अनेक चाकरमान्यांनी यंदा रेल्वे प्रवासाकडं पाठ फिरवली आहे. मध्य रेल्वेहून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुटणाऱ्या चार रेल्वेगाड्यांची अवघी १० टक्के आसनेच आरक्षित झाली आहेत.

कोकणातील विलगीकरणाचे नियम आणि राज्य सरकारनं उशिरा दिलेल्या परवानगीमुळं अनेकांनी कोकणात उत्सवासाठी जाणं टाळलं असल्याचं दिसत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रेल्वेला प्रथम पसंती देण्यात येते. यंदा आधी लेखी मंजुरी देऊन तोंडी सूचना देत राज्य सरकारनं गाड्या थांबवल्या. ७ दिवसांनंतर रेल्वेला परवानगी दिल्यानं अखेर शनिवारी रेल्वेगाड्या कोकणासाठी रवाना झाल्या. त्यामुळे रेल्वेची प्रतीक्षा करण्यापेक्षा खासगी बस, एसटीद्वारे मोठ्या संख्येनं प्रवासी कोकणात दाखल झाले.

पहिल्या दिवशी मुंबईहून ४ रेल्वेगाड्या कोकणासाठी रवाना होणार होत्या. या ४ गाड्यांची एकूण प्रवासी क्षमता ६५५२ इतकी होती. मात्र, केवळ १०४८ प्रवाशांनीच आरक्षण केलं. २१ तारखेपर्यंत गाड्यांचं आरक्षण केवळ १० ते २० टक्केच झालं. 

विशेष गाड्या

गाडी क्रमांक
आसनक्षमता
आरक्षित
उपलब्ध
०११०१ (सीएसएमटी-सावंतवाडी)
१६३८
४४४
११९४
०११०३ (एलटीटी-कुडाळ)
१६३८
४२८
१२१०
०११०५ (सीएसएमटी-सावंतवाडी)
१६३८
१२२
१५१६
०११०७ (एलटीटी-रत्नागिरी)
१६३८
५४
१५८४
एकूण
६५५२
१०४८
५५०४

   


हेही वाचा -

मुंबईकरांवरील पाणीटंचाईचं संकट लवकरच दुर होण्याची शक्यता

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा