Advertisement

बोरिवली, वांद्रे, गोरेगावमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, बोरिवली, वांद्रे, गोरेगावमध्ये रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

बोरिवली, वांद्रे, गोरेगावमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र, बोरिवली, वांद्रे, गोरेगावमध्ये रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.  गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे रुग्णवाढ झाल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील कोरोना आता नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे.

महापालिकेच्या २४ पैकी १० वाॅर्डमध्ये रुग्णदुपटीचा काळ १०० दिवसांच्या वर गेला आहे. मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी जाण्यापूर्वी खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी झाली होती. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत रुग्णांची संख्या वाढली आहे. बोरिवली, वांद्रे (पश्चिम), कांदिवली, दहिसर, गोरेगाव, कुलाबा, मरिन लाइन्स, ग्रॅन्ट रोड भागात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी येथीलरुग्णसंख्या नियंत्रणात  होती. मात्र पुन्हा त्यात हळूहळू वाढ होत आहे.

एल वाॅर्डमधील कुर्ला आणि आसपासच्या परिसरातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४२ दिवसांवर पोहोचला. मात्र २५ ऑगस्टपासून या भागातील रुग्ण संख्या वाढू लागली आहे. २५ ऑगस्ट रोजी १७, २६ ऑगस्ट रोजी ३२, २७ ऑगस्ट रोजी ३४, २८ ऑगस्ट रोजी ३५, २९ ऑगस्ट रोजी ४१ नवे रुग्ण आढळले.

खार (एच-पूर्व), भांडुप (एस), दादर (जी-उत्तर), अंधेरी (के-पूर्व), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण), भायखळा (ई), सॅण्डहर्स्ट रोड (बी), चेंबूर – पूर्व (एम-पूर्व), चेंबूर पश्चिम (एम-पश्चिम) या भागांत सध्या रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १०० दिवसांहून अधिक आहे.


हेही वाचा

माहिम आणि दादरमध्ये पालिकेद्वारे मोफत कोरोना अँटिजेन चाचणी

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या घटून ५५४ वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा