Advertisement

मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच

मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये मलेरियाचे ११३७ रुग्ण सापडले असून, त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताच
SHARES

मुंबईत ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसानं तुफान बॅटींग केली. या पावसामुळं मुंबईत साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळं कोरोनासोबतच आता महापालिकेसमोर मलेरियासह इतर आजारांचे आव्हान आहे. मुंबईमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या ११३७ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये मलेरियाचे ११३७ रुग्ण सापडले असून, त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये हे प्रमाण ८२४ रुग्ण इतकं होतं. मलेरियाची रुग्णसंख्या वाढत असताना मागील वर्षाच्या तुलनेत इतर आजारांनी अद्याप शहरामध्ये डोके वर काढलेले नाही. मलेरिया पाठोपाठ मुंबईमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्याही वाढलेली आहे.

गतवर्षी मुंबईत डेंग्यूच्या ४९ रुग्णांची नोंद झाली होती, यावर्षी ही संख्या ४५ आहे. तसंच, गॅस्ट्रोचे ५३, हेपेटायटिसचे १० आणि एच१.एन१.चा एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, मलेरियावर नियंत्रिण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेनं संशयित रुग्णांच्या रक्तचाचण्या करून घेण्यावर भर दिला आहे. तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यावरही भर दिला आहे. रॅपिड अँटिजेन चाचण्या करून मलेरियाच्या तापाचं निदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

बांधकामक्षेत्रातील परिसरामध्येही सर्वेक्षणाचा वेग वाढवण्यात आला आहे. खासगी डॉक्टरांनाही मलेरियाचे त्वरित निदान करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

रुग्णसंख्या

आजार 
रुग्णसंख्या (आत्तापर्यंत) 
रुग्णसंख्या (२०१९)
मलेरिया 
११३७ (२ मृत्यू) 
८२४
लेप्टोस्पायरोसिस 
४५ 
४९
स्वाइन फ्लू 
१ 
३६
गॅस्ट्रो 
५३ 
६२३
हेपेटायटिस 
१० 
१४७
डेंग्यू 
१० 
१३४हेही वाचा -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा