Advertisement

गणेशोत्सवानंतर ठाणे, पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

गणेशोत्सवाआधी ठाणे आणि पनवेलमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

गणेशोत्सवानंतर ठाणे, पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले
SHARES

गणेशोत्सवानंतर ठाणे आणि पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दरदिवशी दोन्ही शहरांमध्ये दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  

गणेशोत्सवाआधी ठाणे आणि पनवेलमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात होती. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. तसंच घराघरांतही झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. सामाजिक अंतराच्या नियमाला हारताळ फासल्याने केरोना संसर्ग वाढल्याचे पनवेल पालिकेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.

मिशन बिगीन अगेनमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने ठाणे पालिका आयुक्तांनी १८ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. लाॅकडाऊनमध्ये ठाण्यामध्ये रुग्ण संख्या घटली. साडेचारशे असणारी रुग्णसंख्या सुरुवातीला ३०० च्या आत आणि नंतर २०० च्या आत आली होती. मात्र, त्यानंतर गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत पुन्हा वाढ दिसून आली. 

ठाण्यात ३ सप्टेंबर ३२९, २ सप्टेंबर २७३, १ सप्टेंबर २२४,  ३१ ऑगस्ट १८८, ३० ऑगस्ट २०८, २९ ऑगस्ट २४०, २८ ऑगस्ट १९७, २७ ऑगस्ट १७०, २६ ऑगस्ट १९३, २५ ऑगस्ट १२९, २४ ऑगस्ट १२५ अशी रुग्णसंख्या आढळून आली.

पनवेल महापालिका क्षेत्रात मागील १२ दिवसांत २ हजार ६५८ करोनाग्रस्त वाढले आहेत.  सहा महिन्यांत पनवेल पालिका क्षेत्रात १२ हजार २२७ रुग्ण आढळले. कआतापर्यंत १० हजार ५२१ रुग्ण उपचारांनंतर घरी परतले आहेत. सध्या १ हजार ४११ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका क्षेत्रातील २९५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

ऑगस्टमध्ये अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली. गणेशोत्सवामुळे सर्व दुकाने खुली करण्यात आली. त्यामुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. तसंच ऑगस्ट महिन्यात शेवटच्या दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन येणारे तसेच रेल्वेने परराज्यातून येणारे प्रवासी वाढले. त्यामुळे देखील रुग्ण संख्या वाढल्याचं बोललं जात आहे.



हेही वाचा -

मुंबईत १५२६ नवे रुग्ण, ३७ जणांचा दिवसभरात मृत्यू

राज्यात १८ हजार १०५ नवे रुग्ण, ३९१ जणांचा दिवसभरात मृत्यू



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा