Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २४८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ( ३ सप्टेंबर) २४८ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ६ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये नवीन पनवेलमधील २, तसेच खांदा कॉलनी, पनवेेल कळंबोली आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २४८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ( ३ सप्टेंबर) २४८ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ६ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये नवीन पनवेलमधील २, तसेच खांदा कॉलनी, पनवेेल कळंबोली आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश झाला आहे.  १८४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४१,  नवीन पनवेलमधील ४४, खांदा कॉलनीतील १४, कळंबोली-रोडपाली येथील ३२, कामोठ्यातील ५३, खारघरमधील ६३,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील ४०,  नवीन पनवेलमधील ३१, कळंबोली-रोडपाली येथील १९, कामोठ्यातील ३३, खारघरमधील ५४,  तळोजा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण १२४७५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी १०७०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १४६९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 


हेही वाचा -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा