कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं राज्यातील 'या' जिल्ह्यांत मृत्यूसंख्या वाढती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असला तरी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात रुग्णसंख्येमध्ये वेगाने वाढ झाली असली, तरीही मृत्यूची संख्या शहरात कमी झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये मात्र ती वाढलेली दिसून येते. ज्या जिल्ह्यांना पहिल्या लाटेमध्ये संसर्गाची लागण झाली नव्हती, अशा जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

रुग्णसंख्या अधिक असली, तरी मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेमध्ये शहरात कमी झालेले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये वैद्यकीय विश्लेषणामध्ये नमूद केलेला कालावधी हा ९ महिने आणि दुसऱ्या लाटेतील कालावधी हा ५ महिन्यांचा असला, तरीही दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा जोर हा पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक होता. त्या मानेने मृत्युदर रोखून धरण्यामध्ये यंत्रणांनी नियंत्रण मिळवले असल्याचे दिसून येते. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण कमी होते तिथे मृत्यूसंख्या वाढलेली दिसते.

मुंबईमध्ये (Mumbai) मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये ११ हजार ११६ जणांचा मृत्यू झाला, तर यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीमध्ये ३,४९७ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. पहिल्या वर्षात ९ महिन्यामध्ये २ लाख ९३ हजार ४३६ रुग्णसंख्येची नोंद झाली होती. दुसऱ्या लाटेमध्ये हे प्रमाण ४ लाख ४ हजार ५२३ इतके नोंदवण्यात आले होते. याचाच अर्थ रुग्णसंख्येमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये वाढ झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले नाही.

ठाण्यात पहिल्या लाटेमध्ये ५,५७७ जणांनी प्राण गमावले, तर जानेवारी ते मे या कालावधीमध्ये २,३८५ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. पहिल्या लाटेत ठाण्यात दोन लाख ५४ हजार ४५७ रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती, तर दुसऱ्या लाटेत ही रुग्णसंख्या ३ लाख तीन हजार १९५ इतकी नोंदवण्यात आली.

पालघरमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९११, रायगडमध्ये १४८७, रत्नागिरीमध्ये ३७७, सिंधुदुर्गमध्ये १६०, पुण्यात ७७६७, सातारा येथे १७६३, सांगलीमध्ये १७६९, कोल्हापूरमध्ये १६६०, नाशिकमध्ये १८९९, नागपूरमध्ये ३२०४ जणांचे मृत्यू नोंदवण्यात आले होते.

औरंगाबाद येथे पहिल्या लाटेत १,२११ जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेमध्ये येथे १,४०७; तर गडचिरोलीत ८७ मृत्यू पहिल्या लाटेवेळी होते, तर दुसऱ्या लाटेत ३१६ मृत्यू झाले.

चंद्रपूरमध्ये पहिल्या लाटेदरम्यान ३८९, तर दुसऱ्या लाटेमध्ये ९४९ जणांनी प्राण गमावले. गोंदियामध्येही १५६, तर दुसऱ्या लाटेमध्ये २७० जीव गमावला.


हेही वाचा - 

दारू अवैध विकली जाते म्हणून बंदी उठवणं तर्कहीन- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवली, सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध


पुढील बातमी
इतर बातम्या