गायीचं दूध २ रुपयांनी महागणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यभरात गायीच्या दूध विक्री दरात येत्या ८ जूनपासून प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे दुधाचा दर प्रति लिटर ४२ रुपयांवरून ४४ रुपयांवर जाणार आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वीच मदर डेअरी, अमूलचं दूध २ रुपयांनी महाग झालं होतं. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मुंबई मिल्क असोसिएशन अंतर्गत मुंबई आणि ठाण्यात जवळपास १,७०० डेरींचा समावेश आहे. वाढीव दरानुसार येत्या शनिवारपासून गायीच्या दुधासाठी ४४ रुपये मोजावे लागतील. म्हशीच्या दुधाचे दर मात्र तसेच राहतील. म्हशीच्या दुधाची किंमत एप्रिलमध्येच प्रति लिटर २ रुपयांनी वाढवण्यात आली होती. त्यानुसार म्हणीचं सुटं दूध ६४ रुपये प्रति लिटरहून ६६ रुपये प्रति लिटरवर गेलं आहे.

चाऱ्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय, कामगारांचं वेतन आणि वाहतूक खर्च वाढत असल्याने दूधाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ मागणी आणि उत्पादनातील तूट असेपर्यंत कायम राहील, अशी प्रतिक्रिया दूध संघांतर्फे देण्यात आली आहे.


हेही वाचा-

अमूलचं दूध २ रुपयांनी महागलं

अमूलच्या नावाखाली बनावट बटरची विक्री; ठाण्यात एफडीएची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या