Advertisement

अमूलचं दूध २ रुपयांनी महागलं

अमूल दुधाच्या किंमतीमध्ये प्रति लिटर २ रुपयांची दर वाढ करण्यात आली आहे. किंमतीमध्ये करण्यात आलेली दरवाढीची अंमलबजावणी मंगळवार २१ मे पासून होणार आहे.

अमूलचं दूध २ रुपयांनी महागलं
SHARES

अमूल दुधाच्या किंमतीमध्ये प्रति लिटर २ रुपयांची दर वाढ करण्यात आली आहे. किंमतीमध्ये करण्यात आलेली दरवाढीची अंमलबजावणी मंगळवार २१ मे पासून होणार आहे. गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आर. एस सोढी यांनी ही माहिती दिली.    

दुष्काळामुळे जनावरांचं पोट भरण्यासाठी आवश्यक चाऱ्याच्या किंमती आकाशाला जाऊन भिडल्याने शेतकऱ्यांनी जनावरांचा कमी केला आहे. परिणामी दुधाचं उत्पादनही कमी झालं आहे. त्यामुळे अमूलने दुधाचं खरेदीमूल्य वाढवून शेतकऱ्यांना फायदा पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.   

याआधी देखील अमूलने म्हशीच्या दुधातील १ किलो फॅटमागे १० रुपये आणि गाईच्या १ किलो फॅटमागे साडे चार रुपयांची वाढ केली होती.  



हेही वाचा-

भारतीय पितात वर्षाला ५.९ लिटर दारू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा