Advertisement

भारतीय पितात वर्षाला ५.९ लिटर दारू

रताबाबत बोलायचं झाल्यास देशात दारू पिण्याच्या प्रमाणात देखील मागील ७ वर्षांमध्ये (२०१० ते २०१७) ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘लान्सेट’ या मासिकाने सादर केलेल्या ही आकडेवारी देण्यात आली आहे.

भारतीय पितात वर्षाला ५.९ लिटर दारू
SHARES

दारू आरोग्याला घातक असून दारू पिण्याचं प्रमाण कमी करा, असं आवाहन एका बाजूला आरोग्य संघटनांकडून केलं जात असताना, दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावर दारू पिण्याच्या प्रमाणात वाढच होताना दिसून येत आहे. भारताबाबत बोलायचं झाल्यास देशात दारू पिण्याच्या प्रमाणात देखील मागील ७ वर्षांमध्ये (२०१० ते २०१७) ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. ‘लान्सेट’ या मासिकाने सादर केलेल्या ही आकडेवारी देण्यात आली आहे. तसंच या ७ वर्षांत भारतीयांचं दारू पिण्याचं प्रमाण वर्षाला ५.९ लिटरवर गेल्याचंही यांत नमूद करण्यात आलं आहे.


 जगभरात वाढ

सन २०१० मध्ये एक भारतीय वर्षाला सरासरी ४.३ लीटर दारू पित होता. हेच प्रमाण वाढून २०१७ मध्ये ५.९ लिटरवर पोहोचलं आहे. सन २०२५ पर्यंत जगात दारू पिण्याचं प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दीष्ट्य जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने समोर ठेवलं आहे. परंतु मागील १७ वर्षांत दारू पिण्याच्या  प्रमाणात जगभरात झालेली वाढ लक्षात घेता हे उद्दीष्ट्य इतक्यात पूर्ण होईल असं दिसत नाही.

  

गरीब देश आघाडीवर

जगभरात २०१० मध्ये वर्षाला प्रति माणशी ५.९ लिटर दारू प्यायली जात होती. त्यात वाढ होऊन हे प्रमाण प्रति माणशी ६.५ लिटरवर पोहोचलं आहे. १९९० पर्यंत केवळ उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशांमध्येच दारू पिण्याचं प्रमाण अधिक होतं.  परंतु या गटात दारू पिण्याचं प्रमाण स्थिर असून भारतासारखा मध्य उत्पन्न गटातील देश तसंच व्हिएतनामसारखा कमी उत्पन्न गटातील देशात दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही, तर सन २०३० पर्यंत जगातील ५० टक्के लोकसंख्या दारू पिणारी असेल, असंही हा अहवाल सांगतो.  हेही वाचा-

लिंबू सरबत, ऊसाचा रस सांभाळून प्या, मुंबईतील ८१ टक्के बर्फाचे नमुने दूषित

२ मिनिट्स मॅगीचे ३० प्रकारRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा