Advertisement

लिंबू सरबत, ऊसाचा रस सांभाळून प्या, मुंबईतील ८१ टक्के बर्फाचे नमुने दूषित


लिंबू सरबत, ऊसाचा रस सांभाळून प्या, मुंबईतील ८१ टक्के बर्फाचे नमुने  दूषित
SHARES

गेल्या महिन्यात कुर्ला रेल्वे स्थानकावरील एका स्टाॅलवर घाणेरड्या पद्धतीने लिंबू सरबत बनवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी पेय पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरू केली. त्यानुसार महापालिकेने एप्रिल महिन्यात केलेल्या पाहणीत अशा पेय पदार्थांमध्ये वापरणाऱ्या येणाऱ्या बर्फापैकी ८१ टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचं आढळून आलं.

मुंबईत सध्या उकाड्याची लाट असल्याने दुपारच्या वेळेत कामानिमित्त बाहेर पडणारा मुंबईकर तहान लागल्यावर थंडगार लिंबू सरबत, उसाचा रस, ताक, लस्सी किंवा इतर पेय पदार्थांना जवळ करत आहे. या पेय पदार्थांमध्ये वापरण्यात येणारा बर्फ घाणेरड्या पाण्यापासून बनवण्यात येत असल्याने त्यातून रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे बर्फ टाकलेले पेय पदार्थ पिऊ नयेत, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. 

कुर्ला स्थानकावरील घाणेरड्या लिंबू सरबताचा प्रकार समोर आल्यावर महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईत मार्च महिन्यांत ८७ टक्के बर्फाचे नमुने दूषित आढळून आले होते. 



हेही वाचा-

कुर्ला स्थानकावरील 'त्या' लिंबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड

लिंबू पाणी पिण्याचे हे '९' फायदे तुम्हाला चकित करतील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा