अजिंक्यने बीकेसीत केली स्वच्छता, पंतप्रधानांच्या आवाहनाला साद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या भन्नाट फाॅर्ममध्ये असलेला भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने सोमवारी 'स्वच्छताही सेवा' उपक्रमात सहभागी होऊन बीकेसीत साफसफाई केली. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रहाणेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्याबद्दल त्याने पंतप्रधानांचे ट्विटरवरून आभारही मानले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत रहाणे या मोहिमेत सहभागी झाला.

मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्यने नुकत्याच आटोपलेल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आॅस्ट्रेलियाविरूद्ध लागोपाठ ४ अर्धशतके झळकावून चाहत्यांना खूश केले आहे. त्यापाठोपाठ त्याने बीकेसीत साफसफाई करून आपल्या चाहत्यांना स्वच्छतेचा संदेश दिला.

गेल्याच आठवड्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने या मोहिमेत सहभागी होऊन वांद्र्यातील समुद्रक्रिनारी साफसफाई केली होती.

ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. त्यातूनच आपले शहर आणि देश स्वच्छ होऊ शकतो. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पंतप्रधान मोंदी यांनी मला या मोहिमेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे मत यावेळी अजिंक्यने व्यक्त केले.


हेही वाचा -

सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या