Advertisement

सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत


सुनील गावस्कर यांच्या नावाने स्टेडियम, तेही अमेरिकेत
SHARES

ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर (६८) यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असंख्य रेकाॅर्ड केले, मान सन्मान मिळवले. त्यात आता नव्या बहुमानाची भर पडणार आहे. गावस्कर यांच्या नावाने चक्क एक स्टेडियम बांधण्यात येत आहे. हे स्टेडियम भारतातील एखाद्या राज्यात असेल, असा विचार तुम्ही कराल, पण तसे नाहीय. तर क्रिकेटशी दूर दूरचा संबंध नसलेल्या अमेरिकेत हे स्टेडियम उभारण्यात येत आहे.


नव्या रेकाॅर्डची भर

मुंबईची शान आणि भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचे फलंदाज अशी लिटील मास्टर सुनील गावस्कर यांची ओळख आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा १० हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या गावस्कर यांच्या कारकिर्दीची यापूर्वीच क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेली आहे. त्यात नव्या रेकाॅर्डची भर पडणार आहे.


केवळ ३ जणांना सन्मान

आतापर्यंत जगात केवळ ३ खेळाडूंच्या नावाने क्रिकेट स्टेडियम बांधण्यात आले आहेत. त्यात व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम (अँटीगुआ), डॅरेन सॅमी (सेंट लुसिया) आणि ब्रायन लारा स्टेडियम (त्रिनिदाद) या वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यात गावस्कर यांचा देखील समावेश झाला आहे. सध्या गावस्कर यांच्या गौरवार्थ मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

गावस्कर यांच्या नावाने बनविण्यात येणारे हे स्टेडियम अमेरिकेतील लुईसविल केंटकी मध्ये उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमचे उद्घाटन स्वतः सुनील गावस्कर करणार आहेत. भारताबाहेरील स्टेडियमवर नाव असणारे गावस्कर हे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत.



हेही वाचा -

... तर अशी घडली क्रिकेटर पूनम राऊत

रोहित शर्माचा नवा विक्रम

राजा भाईंचं माझ्या करियरमध्ये मोठं योगदान - सचिन तेंडुलकर



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा